कुसुम सोलर पंप योजना २०२४ । Kusum Solar Pump
नमस्कार मित्रांनो , आज आपण या पोस्ट मध्ये कुसुम सोलर पंप योजनेची संपूर्ण माहिती घेणार आहोत, या मध्ये योजनेचा लाभ कसा घ्यायचा, तसेच अनुदान किती मिळणार याची संपूर्ण प्रक्रिया पाहणार आहोत त्या साठी हि संपूर्ण पोस्ट पूर्णपणे वाचा तसेच तुम्हला काही अडचण आल्यास व्हाट्स अँप ग्रुप च्या लिंक वरती क्लिक करून ग्रुप ला जॉईन करा व आम्हाला विचारा.
योजना काय आहे
कुसुम सोलर पंप योजना हि केंद्र सरकार कडून राबवली जाणारी अत्यंत महत्वाची शेतकऱ्यांसाठी योजना आहे. कारण सर्वाना माहित आहे कि शेतकऱ्यांना येणारी सर्वात मोठी अडचन म्हणजे शेतातील लाईट, तसेच शेतातील वीज कनेक्शन चे येणारे लाईट बिल या शेतकरी खूप त्रस्त आहे . त्यामुळे च शेतकऱ्यांचा हा त्रास कमी व्हावा व शेतकऱ्याचे शेतातून भरगोस उत्पन्न मिळावे तसेच शेतकऱ्याला दिवसा मोफत वीज मिळावी या उद्देशाने केंद्र सरकारने कुसुम सोलार पंप योजना हि चालू केली आहे.kusum solar pump yojana 2024
योजनेचा मुख्य हेतू :-
१) शेतकऱ्यांना दिवसा मोफत वीज मिळावी.
२) शेतकऱ्यांच्या उत्पन्नांत वाढ व्हावी.
३) शेतकऱ्यांना कमी पैश्यात सोलार पॅनेल उपलब्ध व्हावा.
योजनेचा लाभ कसा घ्यावा :-
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्वात प्रथम केंद्र सरकारच्या कुसुम सोलार पोर्टल वरती ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यानंतर काही दिवसाने तुमच्या अर्जाची दखल घेतली जाते व त्यानंतर तुम्हाला मंजुरी दिली जाते. या योजनेमध्ये ज्याचा प्रथम अर्ज त्याला प्रथम प्राधान्य अश्या प्रकारे निवड केली जाते.kusum_solar_online_apply
ऑनलाईन अर्ज कारण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
तुमची या योजने मध्ये निवड झाल्यानंतर तुम्हाला मंजुरी चा मेसेज तुमच्या मोबाईल वरती पाठवला जातो. मेसेज आल्यानंतर तुम्हाला कुसुम महाऊर्जा च्या अँप मधून सेल्फ सर्वे करावा लागतो. त्या नंतर तुम्हाला जे काही पेमेंट आहे ते भरावे लागेल.solar_pump_yojana-maharashtra
अनुदान किती दिले जाते :-
या योजने मध्ये सर्वसाधारण लाभार्थी यांना ९०% अनुदान दिले जाते तसेच अनुसूचीत जाती व अनुसूचित जमाती यांना ९५% अनुदान दिले जाते. या योजनेमध्ये जर तुमची निवड झाली तर तुम्हाला फक्त ५ ते १० टक्के रक्कम भरावी लागते.
१) जर तुम्ही ३ एच पी चा सोलार पंप घेतला तर त्याची किंमत अंदाजे १,७०००० /- आहे याची १० % रक्कम म्हणजे १७,००० /- रु तुम्हाला भरावे लागतात
२) जर तुम्ही ५ एच पी चा सोलार पंप घेतला तर त्याची किंमत अंदाजे २,३०,००० /- आहे याची १०% रक्कम म्हणजे २३,०००/- रु हा शेतकरी हप्ता म्हणून भरावा लागतो.
३) जर तुम्ही ७.५ एच पी चा सोलार पंप घेतला तर त्याची किंमत अंदाजे २,७०,००० /- आहे याची १०% रक्कम म्हणजे २७,००० /- रु इतकी रक्कम भरावी लागते.
किती प्रकारचे सोलार पंप आहेत :-
या योजनेमध्ये एकूण ३ प्रकारचे सोलार पंप दिले जातात, ते खालील प्रमाणे
१) ३ एच पी – जर शेतकऱ्यांची जमीन अडीच एकर पर्यंत नावावर असेल तर हा ३ एच पी चा सोलार मिळतो.
२) ५ एच पी – जर शेतकऱ्याची जमीन पाच एकर पर्यंत असेल तर हा ५ एच पी चा सोलार मिळतो.
३) ७.५ एच पी – जर शेतकऱ्याच्या नावावर दहा एकर पर्यंत जमीन असेल तर हा ७.५ एच पी चा सोलार मिळतो.
आवश्यक कागदपत्रे :-
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) सात बार उतारा
४) जमीन व विहीर अथवा बोरवेल सामायिक असल्यास इतर खातेदाराचे संमतीपत्र
टीप :- सोलार पंपाची मंजुरी मिळेपर्यंत कोणाला हि पैसे देण्याची गरज नाही. तसेच मंजुरी मिळाल्यानंतर महाऊर्जा च्या अधिकृत अँप मधूनच पैसे भरावेत.pm kusum yojana 2024