मागेल त्याला सौर पंप |Magel tyala saur pump yojana Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये मागेल त्याला सौर पंप योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या मध्ये आपण या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तसेच या मध्ये नेमके अनुदान किती दिले जाते. या विषयीची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.

राज्य सरकारने शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी या उद्देशाने मागेल त्याला सौर पंप या योजनेची घोषणा केली आहे.

            magel tyala saur pump yojana

योजना काय आहे:-

                          शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी व शेतकऱ्यांच्या शेती उत्पन्नात भरघोस वाढ व्हावी या उद्देशाने राज्य सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी 8 लाख सौर पंप देण्याची घोषणा ही चालू वर्षाच्या आर्थिक संकल्पात केली होती त्या नुसार राज्य सरकारने मागेल त्याला सौर पंप या योजनेची घोषणा केली आहे.

या मागेल त्याला सौर पंप योजनेमध्ये चालू आर्थिक वर्षात 8 लाख शेतऱ्यांना सौर पंपाच वाटप केलं जाणार आहे.magel_tyala_solar

योजनेचा लाभ कसा घ्यायचा :-

या मागेल त्याला सोलर या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या साठी सरकारने पोर्टल देखील लाँच केले आहे.solar_pump_yojana_mharashtra

योजनेची वैशिष्ट्ये :-

  • शेतकऱ्यांना सिंचनासाठी हक्काची स्वतंत्र आणि शाश्वत योजना
  • सर्वसाधारण गटाच्या शेतकऱ्यांसाठी केवळ १० टक्के रक्कम भरून सौर पॅनेल्स व कृषी पंपाचा पूर्ण संच
  • अनुसूचित जाती – जमातींच्या शेतकऱ्यांसाठी लाभार्थी हिस्सा ५ टक्के
  • उर्वरित रक्कम केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान
  • जमिनीच्या क्षेत्रानुसार ३ ते ७.५ एचपीचे पंप
  • पाच वर्षांची दुरुस्ती हमी, इन्शुरन्स सह
  • वीजबिल नाही, लोडशेडिंगची चिंता नाही
  • सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा

लाभार्थी निवडीचे निकष

  • २.५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ३ अश्वशक्ती क्षमते पर्यंतचे सौर कृषीपंप, २.५१ ते ५ एकरापर्यंत शेतजमीन धारक शेतकऱ्यास ५ अश्वशक्ती क्षमतेचा आणि ५ एकरावरील शेतजमीन धारक शेतकऱ्यास ७.५ अश्वशक्ती क्षमतेचा सौर कृषीपंप देय राहील. तसेच पात्र क्षमतेपेक्षा कमी क्षमतेच्या सौर कृषीपंपाचे मागणी केल्यास तो अनुज्ञेय राहील.
  • वैयक्तिक किंवा सामुदायिक शेततळे, विहिर, बोअरवेल यांचे मालक तसेच बारमाही वाहणारी नदी/नाले यांच्या शेजारील शेतजमीनधारक शेतकरी सुध्दा या योजनेसाठी पात्र राहतील.
  • ज्या शेतकऱ्यांकडे बोअरवेल, विहिर व नदी इ. ठिकाणी शाश्वत पाण्याचा स्त्रोत आहे याची खात्री महावितरणद्वारे करण्यात येईल. तथापि, जलसंधारण कामाच्या पाणी जिरविण्याच्या पाणीसाठ्यामधून पाणी उपसण्यासाठी सदर पंप वापरता येणार नाहीत.
  • अटल सौर कृषी पंप योजना-१, अटल सौर कृषी पंप योजना-२ व मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजना या योजनांचा लाभ न घेतलेले लाभार्थी शेतकरी देखील या अभियानांतर्गत लाभास पात्र असतील.’how_to_apply_for_solar_pump_yojana’

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇

https://www.mahadiscom.in/solar_MTSKPY/scheme_info_mr.php

आवश्यक कागदपत्रे:-

  • ७/१२ उतारा ( विहरीची किंवा बोअरवेल ची नोंद असणे आवश्यक)
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • फोटो
  • जमीन / विहीर / बोअरवेल सामाईक असल्यास इतर खातेदारांचे संमतीपत्र magel tyala solar maharashtra

ऑनलाईन फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही लवकरच चालू होणार आहे याची नोंद शेतकऱ्यांनी घ्यावी.

आपल्या You Tube चॅनल ला फॉलो करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇

https://youtube.com/@mahiti_center?si=Eb-FqfKwylm21D5c

हि संपुर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राज्य सरकार अंतर्गत महावितरण मार्फत राबवली जाणार आहे.