मागेल त्याला शेतकरी योजना Mahadbt Farmer Scheme

               mahadbt_farmer_scheme

शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून शेतकर्यांसाठी भरपूर योजना या राबविल्या जातात परंतु या योजनांचा लाभ हा शेतकर्यांना मिळत नाही. या योजना मुख्यत्वे महा डी बी टी या पोर्टल वरून राबविल्या जातात. या पोर्टल च्या मदतीने सर्व योजनांच्या लाभाची रक्कम हि थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. mahadbt_sarkari_yojana

या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम महा डी बी टी फार्मर या सरकाच्या वेबसाईट वर जावून आपली नोंदणी करावी लागते व त्या नंतर ज्या कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो करावा लागेल. वेबसाईट ची लिंक हि खाली दिलेली आहे त्यावती क्लिक करून तुम्ही थेट महा डी बी टी च्या वेबसाईट वर जाताल.shetkari_yojana

ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇

https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/Login/Login

कोणत्या योजनांचा लाभ मिळतो :-

या वेबसाईट वरून नेमक्या कोण कोणत्या योजना राबविल्या जातात याची संपूर्ण माहिती हि खाली दिलेली आहे.

  1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – या योजने अंतर्गत शेतकर्यांना उपयोगी पडणारे तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पाईप, रेन घन, इलेक्ट्रिक मोटार, वयक्तिक शेततळे या योजनांचा लाभ दिला जातो.

अशा भरपूर याजानांचा लाभ या वेब पोर्टल वरून शेतकर्यांना दिला जातो. तसेच या चे जे अनुदान आहे ते थेट बँक खात्यात जमा केले जाते खालीलप्रमाणे farmer_scheme_maharashtra

वरील सर्व योजना या मागेल त्याला योजना या अंतर्गत राबवल्या जातात म्हणजे जो कोणता शेतकरी अर्ज करेल त्याची निवड या अंतर्गत केली जाते व योजनेचा लाभ दिला जातो.

अनुदान किती मिळते :-

  1. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भू धारक शेतकर्यांना ५५% अनुदान दिले जाते, तसेच इतर शेतकर्यांना ४५% अनुदान दिले जाते.

निवड कशी केली जाते :-

अनुदानाची संपूर्ण रक्कम हि पूर्व संमती वर दिलेली असते.या योजने अंतर्गत जो घटक हवा आहे त्याचा ऑनलाईन फोर्म भारावा लागेल त्या नंतर या योजनांची लॉटरी काढली जाते व त्या मध्ये जर तुमचे नाव आले तर तुम्हला तुमच्या मोबाईल वरती मेसेज येतो व त्या नंतर तुम्हाला काही कागदपत्रे जसे कि ७/१२ उतारा, आधार कार्ड ऑनलाईन अपलोड करावा लागतो त्या नंतर तुम्हला पूर्व संमती दिली जाते. पूर्व संमती मिळाल्या नंतर ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे तो घटक सुरवातीला तुमच्या स्व खर्चातून घ्यावा लागतो व नंतर त्या घटकाची जी अनुदानाची रक्कम आहे ती शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.

नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या अनेक योजना या शेतकर्यांसाठी राबविल्या जातात परंतु त्या योजनांचा लाभ हा शेतकर्यांना मिळत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कोठे आणि कसा करायचा हेच माहित नसते, त्यामुळेच आपला बळीराजा या योजनांपासून दूर राहतो.तर या विषयीची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये आहोत.हि पोस्ट शेवटपर्यंत पहा. आपल्या मित्रांना हि महत्वपूर्ण माहिती शेअर करा.mahadabt farmer scheme

आवश्यक कागदपत्रे:-

  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • ७/१२ व ८ अ उतारा
  • सामाईक क्षेत्र असल्यास संमतीपत्र
  • निवड झाल्यानंतर जी एस टी बिल