दुष्काळ अनुदान योजना | Dushkal Anudaan E- Kyc
नमस्कार मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये दुष्काळ अनुदान योजनेचा लाभ कसा घ्यायचा तसेच त्या साठी जी ई- केवायसी करायची ती कशी करायची याची माहिती घेतली आहे.Dushakal Anudaan yojana
दुष्काळ अनुदान योजना काय आहे
शेतकरी मित्रांनो २०२३-२४ या चालू वर्षात राज्यात कमी पाऊस पाडल्या मुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली याच पार्श्भूमीवर राज्य सरकारने एकूण ४० तालुक्या मध्ये दुष्काळ हा जाहीर केला आहे. तरी या तालुक्यामधील शेतकऱ्यांना मदत मिळावी म्हणून दुष्काळ अनुदान योजना ही राबविण्यात आली आहे.Ekyc Dushkal Anudaan
लाभ कोणाला मिळणार
या योजने अंतर्गत ज्या शेतकऱ्यांची दुष्काळा मुळे पेरणी होऊ शकली नाही अशा शेतकऱ्यांना मदत ही दिली जाणार आहे. या मध्ये जे गाव कामगार तलाठी आहेत यांच्याकडून अहवाल व शेतकऱ्यांची यादी ही या पूर्वीच मागवली गेली होती. त्या नंतर आता या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदान जमा केले जाणार आहे. तसेच जे पात्र शेतकरी आहेत त्यांची यादी या मध्ये शेतकऱ्याचे नाव, बँक खाते नं, दुष्काळामध्ये समाविष्ट केलेले एकूण क्षेत्र, तसेच मिळणारी रक्कम इ. माहिती ही तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावलेली आहे.maharashtra farmer scheme
अनुदान मिळण्यासाठी काय करावे :-
१) सर्वात प्रथम शेतकऱ्यांना जी लाभार्थी यादी तलाठी कार्यालयाच्या बाहेर लावलेली आहे ती पहायची आहे.
२) जर या यादीमध्ये नाव असेल तर शेतकऱ्यांनी तलाठी यांच्याकडून आपला वयक्तिक वी के नंबर हा घ्यावा
३) त्यानंतर आपल्या जवळील आपले सरकार सेवा केंद्र अथवा महा – ई सेवा केंद्र मध्ये जविन आपली ई – केवायसी करून घ्यावी त्यानंतर च शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे अनुदानाचे पैसे जमा करण्यात येतील.dushakal anudaan yojana
कागदपत्रे काय लागतील :-
या मध्ये शेतकऱ्यांसाठी सर्वात अडचणीचा मुद्दा म्हणजे कागदपत्रे कोणती लागणार तर या साठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत
१) आधार कार्ड
२) बँक खात्याची झेरॉक्स
3) ई – केवायसी करण्यासाठी लाभार्थी स्वतः असणे आवश्यक
४) वी के नंबर
तर मित्रांनो अश्या प्रकारे आपण दुष्काळ अनुदान योजनेचा लाभ घेवू शकतो.
जर माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेयर करा
धन्यवाद.