फवारणी यंत्र अनुदान योजना । फवारणी पंप घ्या १०० % अनुदानावर
नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची योजना म्हणजे फवारणी यंत्र अनुदान योजना या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शेता मध्ये फवारणी करण्यासाठी जे यंत्र असते ते घेण्यासाठी अनुदान दिले जाते, परंतु बऱ्याचश्या शेतकऱ्यांना या योजनेची माहिती नसल्यामुळे शेतकरी या योजनेपासून वंचित राहतात व या योजनेचा लाभ मिळत नाही तरी आपण या पोस्ट मध्ये या योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये या योजनेचा नेमका लाभ कसा घ्यायचा तसेच या साठी ऑनलाईन फॉर्म कसा व कोठून भरायचा तसेच या योजनेअंतर्गत नेमके कोणते शेतकरी भाग घेऊ शकतात तसेच या साठी अनुदान किती दिले जाते व या योजनेसाठी कागदपत्रे कोण कोणती लागतात या ची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत त्या साठी पोस्ट संपूर्ण वाचा व माहिती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा.paipline_anudaan_yojana
योजना काय आहे :-
फवारणी यंत्र अनुदान योजना हि राज्य सरकार कडून राबवली जाणारी महत्वाची योजना आहे. योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना शेतातून जास्तीत जास्त फायदा व्हावा या साठी हि योजना राबवली जाते जेणेकरून शेतकऱ्यांचे आयुष्य सुखाचे व समृद्धीचे व्हावे व शेतकऱ्यांना शेतातून भरगोस उत्पन्न मिळावे म्हणून हि योजना राबवली जाते. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना फवारणी यंत्र घेण्यासाठी अनुदान दिले जाते. या मध्ये शेतकयांना सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करावा लागतोत. हि योजना राज्य शासनाकडून महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल वरून राबवली जाते.”favarani-yantr-anudaan-yojana”
ऑनलाईन फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया :-
- योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना सर्वात प्रथम गुगल मधून महाडीबीटी शेतकरी योजना या पोर्टल वरती जायचे आहे, या पोर्टल ची डायरेक्ट लिंक खाली दिली आहे. या पोर्टल वरती आल्यानंतर या ठिकाणी सर्वात आधी शेतकरी म्हणून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड लाला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती एक ओटीपी पाठवला जाईल तो ओटीपी टाकून तुमचे आधार व्हेरिफिकेशन करून घ्यावे लागेल त्यानंतर तुमची नोंदणी पूर्ण होईल.
- नोंदणी झाल्या नंतर पोर्टल च्या होम पेज वरती यायचे आहे व अर्जदार लॉगिन या ऑपशन वरती क्लिक करून नोंदणी करताना जो युवजरनेम व पासवर्ड तयार केला होता तो टाकून लॉगिन करून घ्यायचे आहे.
- त्या नंतर तुम्हाला तुमची बेसिक माहिती माझी प्रोफाइल या पर्यायामध्ये जाऊन भरावी लागेल या मध्ये तुमचे नाव, बँक खाते क्रमांक, तसेच तुमच्या शेताचा तपशील यामध्ये शेत जमीन किती आहे हि माहिती भरून घ्यायची आहे. संपूर्ण माहिती भरून झाल्या नंतर होम पेज वरती एक पर्याय दिला आहे अर्ज करा त्या पर्यायावरती क्लिक करायचे.
- नंतर एक नवीन पेज दिसेल या ठिकाणी तुम्हाला एकूण ४ पर्याय दिसतील त्यामधील १ नंबरचा जो पर्याय आहे तो म्हणजे कृषी यांत्रिकीकरण त्या पुढील जो बाबा निवडा म्हणून पर्याय दिला आहे त्या पर्यायावरती क्लीक करायचे त्या नंतर लहान फॉर्म दिला तो फॉर्म भरून घ्याचा यामध्ये गाव , गट नंबर, येईल त्या नंतर एक पर्याय आहे बाब म्हणून या मध्ये मुख्य घटक मध्ये कृषी यांत्रिकिकरण हा पर्याय निवडायचा, त्यानंतर बाब मध्ये पीक संवरक्षण औजारे निवडायचे, त्या नंतर पुढील पर्यायामध्ये फवारणी यंत्र ब्याटरी चलित हा पर्याय निवडायचा mahadbt farmer scheme
- संपूर्ण फॉर्म एकदम व्यवस्थित भरल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लीक करायचे त्या नंतर होम पेज वर एक पर्याय दिला आहे कि अर्ज सादर करा म्हणून त्या पर्यायावरती क्लीक करायचे त्या नंतर आता जो तुम्ही फवारणी यंत्रासाठी अर्ज भरला आहे तो दाखवला जाईल त्या नंतर पुढील बॉक्स मध्ये प्राधान्य क्रमांक देऊन घ्यायचा आणि सबमिट या पर्यायावरती क्लीक करून मेक पेमेंट या पर्यायावरती क्लिक करायचे आणि २३.६० रु चे पेमेंट करून घ्यायचे, हि संपूर्ण प्रोसेस करून ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा.favarani pump yojana
ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
निवड कधी व कशी होते :-
ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर निवड हि लॉटरी पद्धतीने केली जाते, हि लॉटरी दार ५ – १० दिवसांमध्ये घेतली जाते, लॉटरी मध्ये निवड झाल्या नंतर तुम्हाला एक मेसेज दिला जातो त्यानंतर तुम्ही महाडीबीटी या पोर्टल वरती जाऊन लॉगिन करायचे व कागदपत्रे अपलोड करा या पर्यावरती क्लिक करून ७/१२, ८ अ, बँक पासबुक हि कागदपत्रे अपलोड करून घ्यायची त्या नंतर काही दिवसांनी तुम्हला पूर्वसंमती दिली जाते व पूर्व संमती आल्या नंतर तुम्हला या फवारणी यंत्राचे वाटप कृषी विभागामार्फत केले जाते, या मध्ये मोफत हे फवारणी यंत्र दिले जाते १०० % अनुदानावरती.favarani_pump_anudaan_yojana
अनुदान किती मिळते :-
या योजनेमध्ये फवारणी यंत्रासाठी १००% अनुदान दिले जाते. तुम्हाला फक्त ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल
ऑनलाईन फॉर्म भरण्याची अंतिम दिनांक १४-०८-२०२४ आहे.
आवश्यक कागदपत्रे :-
१) आधार कार्ड
२) बँक पासबुक
३) ७/१२ व ८ अ
४) जी एस टी बिल
अर्ज कोण करू शकते :-
या योजनेमध्ये अल्प, अत्यल्प व बहूभूधारक शेतकरी अर्ज करू शकतात फक्त नावावर शेती असणे आवश्यक.