कुसुम सोलार पंप योजना २०२४ | Kusum Solar Pump Yojana 2024
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये आपण कुसुम सोलार पंप योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या मध्ये आपण या योजनेचा लाभ नक्की कसा घ्यायचा, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, तसेच या मध्ये नेमके अनुदान किती दिले जाते. या विषयीची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.
कुसुम सोलार पंप योजना :-
कुसुम सोलार पंप योजना हि केंद्र व राज्य सरकार मार्फत राबवली जाणारी एक सर्वात महत्वाची योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश शेतकर्यांसाठी दिवसा मोफत वीज मिळावी व शेतकर्यांच्या उत्पन्नात भरगोस वाढ व्हावी. परंतु शेतकर्यांपर्यंत या योजनेचा लाभ मिळत नाही, त्यामुळे च आपण या पोस्ट मध्ये नक्की या योजनेचा लाभ कसा घ्यायचा तसेच फक्त १५ दिवसांमध्ये सोलार पंप मंजूर कश्या प्रकारे होतो, याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत.
हि योजना प्रामुख्याने राज्य व केंद्र सरकारमार्फत राबवली जाते, यातून शेतकर्यांना सोलर पंप शेतामध्ये बसवून दिला जातो, या मध्ये शेतकर्यांसाठी भरगोस अनुदान दिले जाते नेमके अनुदान किती दिले जाते याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.kusum-solar-pump-yojana
अर्ज कोठे व कसा करायचा :-
प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना हि केंद्र सरकारमार्फत महाउर्जा म्हणजे अंतर्गत राबवली जाते तसेच हीच योजना राज्य सरकारमार्फत महावितरण अंतर्गर रावबली जाते. आपण नेमका अर्ज कोठे व कसा करायचा हे या ठिकाणी सांगणार आहोत.
१) जर तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना महाउर्जा म्हणजे केंद्र सरकारमार्फत योजनेचा लाभ घ्याचा असेल तर महाउर्जा च्या वेबसाईट वरून अर्ज करावा लागेल, त्याची लिंक खाली दिलेली आहे. परंतु जर तुम्ही महाउर्जा अंतर्गत फॉर्म भरला तर तुम्हाला अर्जाची मंजुरी मिळण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, करण या योजनेअंतर्गत अर्ज करणाऱ्या शेतकर्यांची संख्या खूप आहे. या मुळे तुम्हाला जो पर्याय योग्य वाटेल तो पर्याय निवडावा.kusum solar pamp maharashtra
महाउर्जा अंतर्गत ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करावे
https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
२) जर तुम्ही प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना महावितरण अंतर्गत भरला तर तुमच्या अर्जाला संमती लवकर मिळेल परंतु हा अर्ज करणे थोडे कठीण आहे, परंतु नेमका अर्ज योग्य प्रकारे कसा करायचा याची माहिती आपण या ठिकाणी सांगणार आहोत. सर्वात प्रथम तुम्हाला महावितरण च्या वेबसाईट वरून शेतातील मोटर साठी नवीन कनेक्शन साठी अर्ज करायाच आहे परंतु हा जो अर्ज असणार आहे तो तुमच्या विहारीपासून ते मेन लाईट लाईन मधील एकूण अंतर हे १०० फुट पेक्षा जास्त आहे असा अर्ज करायचा म्हणजे तुम्हाला सर्विस कनेक्शन साठी नाही तर एक पोल अंतरा साठी अर्ज करायचा आहे, ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर सर्व कागदपत्रे जोडून अर्ज महावितरण कार्यालात दाखल करायचा व डिमांड काढून घ्यायचे व डिमांड साठी जे काही पैसे म्हणजे जवळपास ११,५०० रु महावितरण कार्यालयात भरून घ्यायचे त्यानंतर तुम्हला एक ग्राहक क्रमांक मिळेल, आत तुम्ही पैसे भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत असलेले ग्राहक आहात.
ग्राहक क्रमांक मिळाल्यानंतर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजना महावितरण अंतर्गत सोलार साठी फोर्म भरायचा आहे. या मध्ये अर्ज करताना त्या ठिकाणी विचारले जाईल कि तुम्ही पैसे भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहे का त्या ठिकाणी होय या पर्यायावरती क्लिक करून तुम्हला मिळालेला ग्राहक क्रमांक टाकून संपूर्ण माहिती भरून नोंदणी करून घ्यायची.solar_online_application_form
या ठिकाणी सर्वात महत्वाची माहिती म्हणजे तुम्ही नवीन कनेक्शन साठी जे काही पैसे म्हणजे ११,५०० रु भरले होते ते पैसे हे एकूण सोलर पंप ची किंमत असेल त्या किंमतीतून वजा केली जाईल म्हणजे जर ३ एच पी च्या पंपाची किंमत २२,७९१ रु असेल तर त्या किंमतीतून कनेक्शन साठी भरलेले एकूण पैसे ११,५०० रु वजा करून उर्वरित ११,२९१ व जी एस टी एवढेच पैसे हे तुमच्याकडून म्हणजे शेतकरी हिस्सा म्हणून घेतला जाईल व फक्त १५ दिवसांमध्ये सोलर पंपाची मंजुरी हि दिली जाते.
महावितरण अंतर्गत ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://kusumbenef.mahadiscom.in/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B
प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजेसाठी अनुदान किती :-
या योजने अंतर्गत क्षेत्रानुसार तीन प्रकारचे पंप दिले जातात ते खालीलप्रमाणे
१) जर एकून क्षेत्र १० गुंठे ते २.५ एकर असेल तर तुम्हाला ३ एच पी चा सोलार पंप दिला जातो या साठी ओपन कॅटेगरी साठी ९०% अनुदान दिले जाते व SC व ST कॅटेगरी साठी ९५% अनुदान दिले जाते समजा जर सोलर पंपाची किंमत २,३०,०००रु असेल तर ओपन कॅटेगरी शेतकर्यांना फक्त २३,००० रु भरावे लागतील तसेच SC व ST कॅटेगरी शेतकर्यांना ११,५०० रु भरावे लागतील.
२) जर एकूण क्षेत्र हे २.५ एकर ते ५ एकर असेल तर ५ एच पी चा पंप दिला जातो व अनुदांची किंमत हि वरील प्रमाणेच असेल फक्त पंपाची किंमत हि वेगळी असेल.
३) जर एकूण क्षेत्र हे ५ एकर पेक्षा जास्त असेल तर ७.५ एच पी चा पंप दिला जातो व अनुदांची किंमत हि वरील प्रमाणेच असेल फक्त पंपाची किंमत हि वेगळी असेल.
आवश्यक कागदपत्रे :-
१) ७/१२ उतारा
२) आधार कार्ड
३) बँक पासबुक
४) अर्जदाराचा फोटो
५) जमीन किंवा विहीर अथवा बोर जर सामाईक असेल तर इतर हिस्सेदारांचे संमतीपत्र
६) महावितरण अंतर्गत अर्ज भरला तर डिमांड भरलेली पावती
अश्या प्रकारे आपण प्रधानमंत्री कुसुम सोलार पंप योजनेचा लाभ हा घेवू शकतो या योजेची मंजुरी हि फक्त १५ दिवसांमध्ये मिळू शकते.
जर तुम्हाला हि माहिती आवडल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.