माझी लाडकी बहिण योजना Mazi Ladaki Bahin Yojana Maharashtra
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. या योजनेमध्ये नेमके पात्र महिला कोण असणार, तसेच अर्ज कोठे व कसा करायचा, त्यासाठी कागदपत्रे कोण कोणती लागणार आहेत. याची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत. तसेच या योजनेविषयी संपर्ण माहिती सविस्तर पणे पाहणार आहोत त्या साठी हि संपूर्ण पोस्ट शेवटपर्यंत वाचा.
काय आहे योजना :-
राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठीआणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना राबववण्याबाबत शासन निर्णय दि.28.06.2024 अन्वये मान्यता देण्यात आली आहे. या योजने अंतर्गत राज्यातील ज्या महिला पात्र असतील त्यांना दर महा १५०० रु त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. मात्र या योजनेच्या ज्या अटी व शर्ती आहेत त्या खालील प्रमाणे दिला आहेत.mazi ladaki bahin yojana offical website
योजनेच्या लाभार्थ्यांची पात्रता :-
१) लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असणे आवश्यक
२) राज्यातील विवाहित, विधवा , अविवाहित, घटस्पोटीत, आणि निराधार महिला पात्र असणार आहेत.
३) किमान वय २१ वर्ष पूर्ण व कमाल वय ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत
४) सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी बँक खाते असणे आवश्यक
५) लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाखांपेक्षा जास्त नसावे.
वरील दिलेल्या पात्रते नुसार ज्या महिला पात्र असतील त्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहेत.’Mazi ladki bahin yojana maharashtra online apply 2024′.
योजनेसाठी लागणारी कागदपत्रे:-
१) आधार कार्ड
२) रहिवाशी प्रमाणपत्र / शाळा सोडल्याचा दाखला / जन्म प्रमाणपत्र / १५ वर्षा पूर्वीचे रेशन कार्ड / १५ वर्षा पूर्वीचे मतदान कार्ड
३) उत्पन्न प्रमाणपत्र / पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड
४) हमीपत्र
हमीपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
कुसुम सोलर पंप योजनेची माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
योजनेचा फोर्म कोठा भरावा :-
माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम ऑनलाईन किंवा ऑफलाईन फोर्म भरावा लागेल. या योजनेचा ऑनलाईन फोर्म हा तुम्ही घरबसल्या मोबाईल मधून नारी शक्ती दूत या app मधुन भरू शकता या वरून फोर्म भरल्यानंतर तुम्हाला कोठेही जाण्याची गरज नाही. “Mazi ladki bahin yojana 2024 online apply link”
तसेच दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडून ऑफलाईन हा फोर्म एकदम मोफत मध्ये भरून शकता.Majhi ladki bahin yojana online apply link
तर अश्या प्रकारे हि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ तुम्ही घर बसल्या घेवू शकता जर तुम्हाला हि माहिती आवडली असल्यास आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.