मुख्यमंत्री मोफत गॅस योजना
नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये मुख्यमंत्री मोफत गॅस योजना म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजेविषयी माहिती सांगणार आहोत. नेमके या योजनेचा लाभ कोणत्या कुटुंबाना मिळणार त्यासाठी पात्रता काय असणार याची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये पाहणार आहोत.Free gas yojana maharashtra online
योजना काय आहे :-
देशातील तसेच राज्यातील महिलांना धूरमुक्त वातावरणात जगात यावे तसेच गरीब कुटुंबाना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन मिळावे या उद्देशाने सरकारणे या योजनेची सुरवात केलेली आहे.तसेच याच उद्देशाने कें द्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन-2016 मध्ये सुरु करण्यात आली आहे. सदर योजनेंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जोडणी देण्याचे काम तेल कंपन्याच्या सहकायाने सुरु आहे. सदर योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडण्या असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजार दराने गॅस टाकीचे पुनर्भरण करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही. त्यामुळे हि बाब लक्षात घेवून राज्य सरकारने २०२४ – २५ या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे. या योजनेच्या अंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या तसेच राज्यातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी कुटुंबाना वर्षातून ३ गॅस टाकी चे पुनर्भरण मोफत मध्ये करून मिळणार आहे.’annpurna yojana maharashtra’
शासन निर्णय काय आहे :-
कें द्र शासनाच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील सुमारे ५२.१६ लक्ष लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कु टुंबाला वार्षिक ३ गॅस सीलेंडरचे पुनभगरर्ण (Refill) मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सदर
योजना “मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना” या नावाने राबसवण्यात येईल.”Free gas yojana maharashtra apply online”
शासन निर्णय पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202407301150453906.pdf
लाभार्थ्याची पात्रता :-
- सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी हि महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे.
- सध्या राज्यात असलेले प्रधानमंत्री उज्वला योजनेचे लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
- मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेस पात्र असलेले कुटुंब या योजनेस पात्र असतील.
- एका कुटुंबात ( रेशन कार्ड नुसार ) फक्त एकच लाभार्थी या योजनेस पात्र असेल.
- सदर लाभ १४.२ किलो च्या गॅस जोडणी असलेल्या कुटुंबाना दिला जाईल.mukhyamantri_annpurna_yojana.
वरील माहिती आवडल्यास मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद.