हे काम करा पीक विमा लगेच मिळेल | Pik Vima 2024

 

हे काम करा पीक विमा लगेच मिळेल| Pik Vima 2024

                नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्ट मध्ये शेतकर्यांसाठी सर्वात महत्वाचा विषय म्हणजे पिक विमा ज्यामुळे शेतकर्यांना आर्थिक मदत होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये शेतकर्यांना पिक विमा खूप मुश्कील काम झाले आहे, तरी या पोस्ट मध्ये आपण शेतकर्यांसाठी काही मात्वाची कामे सांगणार आहोत ज्यामुळे शेतकर्यांच्या बँक खात्यात पिक विमा जमा होईल.pik vima 2024

पिक विमा योजना नेमकी काय आहे 

                  शेतकरी मित्रांनो, प्रधानमंत्री पिक विमा योजना नेमकी काय आहे थोडक्यात पाहूयात, तर शेतकर्यांच्या पिकाचा विमा उतरविण्यासाठी प्रत्येक हंगामात हि योजना राबवली जाते, या मुळे जर पिकाचे काही कारणास्तव नुकसान झाले म्हणजे अतिवृष्टी, दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस ई. कारणामुळे नुकसान होते. जर शेतकर्याने आपल्या पिकाचा विमा उतरविला असेल तर त्याचे नुकसान भरपाई हि सरकार मार्फत व विमा कंपन्या मार्फत दिली जाते. या संपूर्ण योजनेलाच प्रधानमंत्री पिक विमा योजना म्हणून ओळखली जाते.pik vima maharashtra

 

पिक विमा मिळण्यासाठी काय केले पाहिजे 

              १) पिक विमा मिळण्यासाठी मित्रांनो, सर्वात आधी आपल्या पिकाचा विअमा उतरविणे गरजेचे आहे त्यासाठी सरकारने दिलेल्या वेळेत आपला ऑनलाईन फॉर्म भरावा लागेल तुम्ही आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जावून भरू शकता.farmer scheme 

               २) जर अतिवृष्टी, दुष्काळ, अवेळी पडणारा पाऊस, रोग ई कारणामुळे तुमच्या पिकाचे नुकसान झाले असल्यास त्याची पूर्वकल्पना किंवा तक्रार हि ७२ तासाच्या आत मध्ये कंपन्यांना देणे गरजेचे आहे हि तक्रार तुम्ही Crop Insurance या अप मधून देवू शकता.pik vima in marathi.

पिक विमा मिळाला नसेल तर हे करा 

               समजा मित्रांनो, तक्रार देवून हि तुमचा विमा आला नसेल तर तुम्हाला पहिले काम करायचे आहे https://www.pmfby.gov.in/  या सरकारच्या वेबसाईट वर जाऊन Application Status म्हणून एक पर्याय दिला आहे त्यावरती जावून आपल्या विमा पावती वरती दिलेला अर्ज क्रमांक टाकून सर्वात आधी अर्जाची स्थिती पहावी लागेल जर या ठिकाणी अर्जाची स्थिती Approved असेल तर काही करण्याची गरज नाही जर त्या ठिकाणी Rejected किंवा Reverted असेल तर ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणी जावून चौकशी करावी लागेल.

             जर समजा फॉर्म Approve झाले असेल व तरीही पैसे आले नसतील तर तुम्हाला तुमच्या बँकेत जावून तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करायचे आहे तसेच तुमच्या NPCI ला बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे जर बँकेत आधार कार्ड देवूनही पैसे येत नसतील तर 

             तुम्हाला सर्वात चांगला पर्याय म्हणजे तुमच्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये तुमचे बचत खाते उघडायचे आहे त्यानंतर तुमचे पिक विम्याचे पैसे हे पोस्ट ऑफिस मध्ये येवून जातील.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 

 https://youtu.be/6mVVbNsWfBE?si=GMBQNapsFY7sUVAy

              तर मित्रांनो अशा प्रकारचे काही पर्याय आहेत ज्या मुळे तुमचे पिक विम्याचे अडकलेले पैसे हे मिळू शकतील.

धन्यवाद .