पीक विमा पाहिजे तर करा तक्रार ऑनलाईन
नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या पोस्ट मध्ये तुमच्या शेती पिकाचे नुकसान झाले असेल तर त्याची ऑनलाईन तक्रार कशी द्यायची याची संपुर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, या मध्ये नेमकी तक्रार कधी द्यायची तसेच नुकसान किती टक्के झाले हे सांगायचे या संदर्भात संपुर्ण माहिती आपण देणार आहोत त्या साठी ही संपुर्ण पोस्ट सविस्तर पणे वाचा व पोस्ट आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून कोणताही शेतकरी पीक विमा योजनेपासून वंचित राहणार नाही.pik_vima_maharashtra
pik_vima_maharashtra_2024
काय आहे योजना
राज्यातील तसेच देशातील शेतकरी समृद्ध व्हावा व शेतकऱ्यांच्या पिकाला एक संरक्षण कवच मिळावे या दृष्टीने केंद्र व राज्य सरकारने मिळून ही प्रधानमंत्री फसल विमा योजनेची सुरवात सरकारने केली आहे, या योजेअंतर्गत शेतकऱ्यांकडून शेती पिकाचा सुरवातीला विमा उतरविला जातो व त्या नंतर जर काही नैसर्गिक आपत्तींमुळे त्या शेती पिकाचे नुकसान झाले असल्यास त्या नुकसान भरापाईपोटी शेतकऱ्यांना जी काही विमा रक्कम असेल ती थेट बँक खात्यामध्ये दिली जाते.pik_vima_takrar
पीक नुकसानीची तक्रार म्हणजे काय
शेतकऱ्यांनी या प्रधानमंत्री फसल विमा योजनेत सहभाग घेतल्यानंतर जर एखाद्या अवकाळी पावसामुळे अथवा इतर कोणत्या नैसर्गिक अपतीमुळे शेतीपोकाचे नुकसान झाले तर त्या पीक नुकसानीची तक्रार पीक विमा कंपन्यांना देणे आवश्यक असते जर ही तक्रार दिली तरच या योजनेमध्ये पात्र ठरवून जी काही विमा संरक्षित रक्कम असेल ती दिली जाते.pik_vima_2024
पीक नुकसानीची तक्रार कोठे व कशी करावी
जर समजा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतीपिकाचे नुकसान झाले तर नुकसान झाल्यापासून 72 तासांच्या आत मध्ये नुकसानीची तक्रार देणे गरजेचे असते तक्रार देण्यासाठी खालील स्टेप्स कराव्यात.
- सर्वात आधी मोबाईल मधील प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे ॲप डाऊनलोड करावे.
- ॲप ओपन केल्याबरोबर 3 नंबर चा जो पर्याय आहे नोंदणी खात्याशिवाय काम सुरू ठेवा या पर्यायावराती क्लिक करायचे.
- त्या नंतर शेतकऱ्याचा चालू मोबाईल नंबर टाकायचा व त्या मोबाईल वरती एक ओटीपी पाठवला जाईल तो टाकून सबमिट या पर्यायावरती क्लिक करायचे.
- त्या नंतर हंगाम, वर्ष, योजना हे पर्याय निवडून पुढे विमा कोठे भरला आहे ते निवडायचे म्हणजे बँकेत, सीएससी सेंटर मध्ये, की शेतकरी लॉगिन मधून.
- संपुर्ण माहिती भरून तुमचा जो पॉलिसी नंबर असेल जो की पीक विमा पावती वरती असेल तो टाकून सबमिट करायचे.
- पॉलिसी नंबर टाकल्याबरोबर शेतकऱ्याची संपुर्ण माहिती दाखवली जाईल ती पहायची आणि सिलेक्ट करून घ्यायचे.
- पॉलिसी सिलेक्ट केल्यानंतर एक लहान फॉर्म येईल तो भरायचा या मध्ये नुकसान कशामुळे झाले म्हणजे पावसमुळेकी इतर कोणत्या कारणामुळे झाले ते निवडायचे व त्या नंतर घटना कधी झाली तो दिनांक निवडायचा तसेच किती टक्के नुकसान झाले ते टाकायचे व शेतातील नुकसान झालेला एक फोटो काढून सबमिट करायचे.
- संपुर्ण माहिती भरून सबमिट केल्यानंतर एक डॉकेट आयडी मिळेल तो जपून ठेवायचा.
Crop Insurance ॲप डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा 👇
https://play.google.com/store/apps/details?id=in.farmguide.farmerapp.central
अश्या प्रकारे आपण घर बसल्या तुम्ही तुमच्या शेती पिकाच्या नुकसानीची तक्रार घर बसल्या देवू शकाता.
तक्रार दिल्यानंतर काही दिवसांनी आपला क्लेम aprove होतो व शेतकऱ्यांना पीक संरक्षित रक्कम दिली जाते.
अश्या प्रकारची संपुर्ण महत्त्वाची माहिती होती जर ती आवडल्यास आपल्या शेतकरी मित्रांनो शेअर करा धन्यवाद.