काय आहे योजना:-
नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाच्या अनेक योजना या शेतकर्यांसाठी राबविल्या जातात परंतु त्या योजनांचा लाभ हा शेतकर्यांना मिळत नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे या योजनांचा लाभ घेण्यासाठी नेमका अर्ज कोठे आणि कसा करायचा हेच माहित नसते, त्यामुळेच आपला बळीराजा या योजनांपासून दूर राहतो.तर या विषयीची संपूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये आहोत.हि पोस्ट शेवटपर्यंत पहा. आपल्या मित्रांना हि महत्वपूर्ण माहिती शेअर करा.mahadabt farmer scheme
शेतकरी मित्रांनो, राज्य शासनाकडून तसेच केंद्र शासनाकडून शेतकर्यांसाठी भरपूर योजना या राबविल्या जातात परंतु या योजनांचा लाभ हा शेतकर्यांना मिळत नाही. या योजना मुख्यत्वे महा डी बी टी या पोर्टल वरून राबविल्या जातात. या पोर्टल च्या मदतीने सर्व योजनांच्या लाभाची रक्कम हि थेट शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. mahadbt sarkari yojana
या योजनांचा लाभ घेण्यासाठी सर्व प्रथम महा डी बी टी फार्मर या सरकाच्या वेबसाईट वर जावून आपली नोंदणी करावी लागते व त्या नंतर ज्या कोणत्या घटकासाठी अर्ज करायचा आहे तो करावा लागेल. वेबसाईट ची लिंक हि खाली दिलेली आहे त्यावती क्लिक करून तुम्ही थेट महा डी बी टी च्या वेबसाईट वर जाताल.shetkari yojana
ऑनलाईन फोर्म भरण्यासाठी खालील लिंक वरती क्लिक करा ;-
https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer/login/login
कोणत्या योजनांचा लाभ मिळतो :-
या वेबसाईट वरून नेमक्या कोण कोणत्या योजना राबविल्या जातात याची संपूर्ण माहिती हि खाली दिलेली आहे.
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना – या योजने अंतर्गत शेतकर्यांना उपयोगी पडणारे तुषार सिंचन, ठिबक सिंचन, पाईप, रेन घन, इलेक्ट्रिक मोटार, वयक्तिक शेततळे या योजनांचा लाभ दिला जातो.
- कृषी यांत्रिकीकरण – उप अभियान :- या योजने अंतर्गत शेतकर्यांना ट्रक्टर, पॉवर टिलर, ट्रक्टर चलित औजारे,बैल चलित औजारे,मनुष्य चलित औजारे,प्रक्रिया संच इ. वस्तू घेण्यासाठी अनुदान दिले जाते.
अशा भरपूर याजानांचा लाभ या वेब पोर्टल वरून शेतकर्यांना दिला जातो. तसेच या चे जे अनुदान आहे ते थेट बँक खात्यात जमा केले जाते ते खालीलप्रमाणे.farmerschememaharashtra
अनुदान किती मिळते :-
- प्रधानमंत्री कृषी सिंचन योजने अंतर्गत अल्प व अत्यल्प भू धारक शेतकर्यांना ५५% अनुदान दिले जाते, तसेच इतर शेतकर्यांना ४५% अनुदान दिले जाते.
- कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या योजने अंतर्गत ४०-५० टक्यांपर्यंत अनिदान दिले जाते.
निवड कशी केली जाते :-
अनुदानाची संपूर्ण रक्कम हि पूर्व संमती वर दिलेली असते.या योजने अंतर्गत जो घटक हवा आहे त्याचा ऑनलाईन फोर्म भारावा लागेल त्या नंतर या योजनांची लॉटरी काढली जाते व त्या मध्ये जर तुमचे नाव आले तर तुम्हला तुमच्या मोबाईल वरती मेसेज येतो व त्या नंतर तुम्हाला काही कागदपत्रे जसे कि ७/१२ उतारा, आधार कार्ड ऑनलाईन अपलोड करावा लागतो त्या नंतर तुम्हला पूर्व संमती दिली जाते. पूर्व संमती मिळाल्या नंतर ज्या घटकासाठी तुमची निवड झाली आहे तो घटक सुरवातीला तुमच्या स्व खर्चातून घ्यावा लागतो व नंतर त्या घटकाची जी अनुदानाची रक्कम आहे ती शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते.
तर अश्या प्रकारे मित्रांनो सर्व सरकारी योजनांचा लाभ हा एकाच पोर्टल वरून घेता येतो जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा.
धन्यवाद.
Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.
Эффективные методы продвижения сайтов в конкурентных нишах
seo продвижение сайта seo продвижение сайта .